गळफास घेऊन वाघोलीत शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाही. औसा तालुक्यातील वाघोली येथील 34 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गेल्या 3-4 वर्षापासून शेतात सतत होणारी नापिकी आणि दुष्काळ याला कंटाळून सत्यवान धोंडीराम पवार (वय 34) रा. वाघोली ता. औसा या शेतकऱ्याने त्याच्याच शेतात १४ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही. शेतात पेरणी झाली नाही मग संसाराचा गाडा कसा चालवायचा. पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे कंटाळून सत्यवान धोंडिराम पवार यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.