पावसाचा स्वभाव बदलला, आयआयटी शास्त्रज्ञांचे संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पाऊस दरवर्षी आपली वेळ चुकवतोय असे गेल्या दशकभरात दिसून आले आहे. पण गेल्या शंभर वर्षातील पावसाचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना समजले की पावसाची केवळ वेळ आणि चक्रच नव्हे तर स्वभावच बदलला आहे. नद्यांच्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे आणि खाडी क्षेत्रांमध्ये मात्र तुफान पाऊस होत आहे. यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून त्यासाठी अधिक अभ्यास होण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञ डॉ. सुबिमल घोष आणि डॉ. सुभांकर करमाकर तसेच आयआयटी मद्रासमधील शास्त्रज्ञ डॉ. के. एस. कासीविश्वनाथन, डॉ. के. पी. सुधीर आणि डॉ. सचिन गुंठे यांचा या संशोधनात समावेश होता. संशोधकांच्या या पथकाने देशभरातील गेल्या शंभर वर्षातल्या पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला. त्यात त्यांना दरवर्षी पावसाचे प्रमाण, वेळ यामध्ये बदल होत गेलेला दिसला.