
सामना ऑनलाईन । पुणे
इंगवली (ता. भोर) येथील नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट बघितला की जणू निसर्गानेच धरणीमातेला दागिना घातला आहे, असा भास होतो. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसराने हिरवाईचा शालू पांघरला असून, येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. (छाया : सचिन गोरे)























































