
सामना ऑनलाईन, खेड
गेले महिनाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गेले महिनाभर खेडमध्ये संततधार तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील आतापर्यंत 88 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. दुभत्या गायीच्या नुकसानीपोटी 30 हजार रुपये,पाच पाळीव जनावरांची नुकसान भरपाई म्हणून 1 लाख 25 हजार रुपये तर दोन मृत वासरांच्या नुकसानीपोटी 32 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झालेल्या तीन गुरांच्या गोठयांसाठी 6 हजार 300 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. खेडमध्ये पावसाचा जोर कायम असून आतापर्यन्त एकूण 2429.68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


























































