
सामना ऑनलाईन । मुंबई
चार महिन्यांचा पगार काढून दिला म्हणून त्याच्या मोबदल्यात सात हजारांची मागणी करून पाच हजारांची चिरीमिरी घेताना पालिकेच्या आय रुग्णालयातील लिपिक ट्रप झाला. धोंडीराम बंडगर (40) असे या लिपिकाचे नाव आहे.
आकाश कुदे (28) याने दिलेल्या तक्रारीवरून ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ही कारवाई केली. आकाशला चार महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. कामाठीपुरा येथील आय रुग्णालयात लिपिक असलेल्या धोंडीरामने आकाशला त्याचा पगार काढून दिला पण त्या मोबदल्यात धोंडीरामने सात हजारांची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने आकाशने ऍण्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ट्रप लावून आकाशकडून पाच हजारांचा हप्ता घेताना धोंडीरामला रंगेहाथ पकडले.





























































