
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा भाऊ इब्राहिम अजहर याच्यासह 15 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलेला असतानाच जैशचे 4ते 5 दहशतवादी गेल्या आठड्यात घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. केरन सेक्टरमधून हे दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली असून या घुसखोरीनंतर जम्मू कश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे घुसखोरी करण्याचे डाव उधळले आहेत. तसेच पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने देखील हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र जवानांनी त्यांची घुसखोरी देखील चार वेळा हाणून पाडली. केरळ सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना शनिवारी जवांनांनी कंठस्नान घातले आहे. केरन व्यतिरिक्त गुरेझ, तंगधर, माछिल सेक्टरमधून देखील घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत.


























































