
सामना प्रतिनिधी । पैठण
नाशिकचा पाऊस पावल्यामुळे नाथसागर धरण तुडुंब भरण्याची चिन्हे दिसत असली तरी मराठवाड्यातील अनेक तालुक्यांप्रमाणे पैठण तालुक्यातही पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अन्य भागात मुसळधार पाऊस सुरू असताना पैठणमध्ये मात्र पावसासाठी यज्ञ सुरू आहे.
शहरातील प्राचीन गाढेश्वर महादेव मंदिरात ‘भव्य पर्जन्ययाग यज्ञ’ चालू आहे. जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे व सोनेचांदीचे व्यापारी तथा धार्मिक ऊपक्रमांचे आयोजन करणारे अनिलसेठ सराफ यांच्या पुढाकाराने दि. 2 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट हा यज्ञ चालणार आहे. दररोज 5 यजमान सपत्निक ‘यज्ञविधी’त सहभागी होतात. 11 वेदशास्र संपन्न ब्रम्हवृंद पौरोहित्य करत आहेत.
























































