साखरपा भंडारवाडी येथील कॉजवे वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

साखरपा भंडारवाडी ते भडकंबा मुस्लीम मोहल्ला यांना जोडणारा कॉज-वे अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. या मोरीचे बांधकाम नुकतेच मे महिन्यात करण्यात आले होते.

काजळी नदीला आलेल्या पुराचा परिणाम साखरपा गावालाही बसत आहे. साखरपा आणि भडकंबा यांच्या सीमेवरून काजळी नदी वाहते. ह्या नदीच्या एका बाजूला साखरपा येथील भंडारवाडी तर समोरच भडकंबा गावातील मुस्लीम मोहल्ला आहे. यांना जोडण्यासाठी कॉज-वे नुकताच मे महिन्यात बांधण्यात आला होता. दि. 27 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा कॉज-वे गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. पुलाचा मधला भाग दोन्ही बाजूने खचला असून मुस्लीम मोहल्याच्या बाजून कॉजवेचा भाग पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे हा कॉज-वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.