शिवसेना भवनात मदतीचा ओघ सुरू, शिवसेनेची शिवसहाय्य पथके आज रवाना होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसहाय्य मदत पथके उद्या, रविवारी राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन रवाना होणार आहेत. अन्नधान्य, गव्हाचे पीठ, बिस्किटे, औषधे, कपडे, चादरी, ब्लँकेट, भांडी, पाण्याच्या बाटल्या घेऊन 12 गाडय़ा सातारा जिह्यातील कराड, पाटण, वाई, तर रायगड जिह्यातील महाड येथे जाणार आहेत.

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख आणि आमदारांची बैठक आज शिवसेना भवन येथे झाली. यामध्ये पूरग्रस्त जिह्यातील शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱयांकडून पूरस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या दुपारी 12 वजता शिवसेना भवन येथून मदत पथके रवाना होणार असून गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस, आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्यावर मदत पोहचविण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानसार आज सकाळपासून शिवसेना भवन येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

मदत पथकांसोबत डॉक्टरांची टीम

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मदत पथकांसोबत डॉक्टरांच्या टीम, कार्यकत्यांचे पथक आणि रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. ऍण्टिबायोटिक्स, कफ सिरप, जुलाब प्रतिबंधक औषधे, उलटी प्रतिबंधक औषध, पाणी शुद्ध करण्यासाठी औषध, बी-कॉम्प्लेक्स, सॅनेटरी नॅपकीन ही औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

कोल्हापूर, सांगलीसाठी पाणी ओसरल्यानंतर मदत

कोल्हापूर, सांगली जिह्यांतील पुराचे पाणी ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्तांसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, औषधे यांची पूर्ण यंत्रणा तयार करून पुढील दोन दिवसांत शिवसेनेची शिवसहाय्य पथके रवाना होतील, अशी माहिती शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, शिवसहाय्य मदत उपक्रमाच्या काळात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा म्हणून दहा हजार कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे शिवसेना नेते- पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

शिवसेना भवन येथे नियंत्रण कक्ष

पूरग्रस्तांच्या मदतीकरिता व त्यांना मदत करू इच्छित असणाऱयांसाठी शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. व्हॉटस्ऍप क्र. 8104864460, व्हॉईस कॉल क्र. 9324322909 हे विशेष क्रमांक कार्यान्वित केले आहेत.