
आचरा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या वतीने जनसंवाद अभियान राबवले जात आहे. शिवसेना युतीच्या माध्यमातून वतीने झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात असून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.
शिवसेनेचे जनसंवाद अभियान आचरा येथे दाखल झाले. आचरेसह चिंदर, कालावल, वायंगणी, त्रिंबक, तोंडवळी गावात जनतेशी आमदार नाईक यांनी संवाद साधला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, विभाग प्रमुख उदय दुखंडे, विनायक परब, उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, जगदीश पांगे, संजय केळुसकर, समीर हडकर, अनिल गावकर, प्रकाश वराडकर, समीर लबदे, नितीन घाडी, सदानंद घाडी, अरविंद घाडी, राजु नार्वेकर, अनुष्का गावकर, भाग्यश्री घागरे, संजना रेडकर व आचरा विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी काही ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
देवबाग-तळाशील बंधाऱ्यासाठी ५ कोटी मंजूर
सागरी अतिक्रमण बांधीत देवबाग व तळाशील किनारपट्टीवर बंधारा उभारणी व जिओ ट्यूब साठी प्रत्येकी अडीज कोटी निधी मंजूर झाला आहे. कणकवली-आचरा, आचरा-मालवण व तोंडवळी-वायंगणी या प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. असेही आमदार नाईक यांनी आचरा येथे बोलताना स्पष्ट केले.
पुन्हा शिवसेना युतीचेच सरकार येणार
येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना युतीचेच सरकार येणार आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत. त्यामुळे राणेंची अवस्था वाईट झाली आहे. राणेंना उमेदवार शोधावे लागत आहेत. कार्यकर्ते सोडून जात असल्याने पडझड थांबवण्यासाठी आपण भाजप मध्ये जात असल्याचे ते सांगत आहेत. मात्र जनतेचा राणेंवरील विश्वास उडाला आहे. अशी टीका आमदार नाईक यांनी यावेळी केली.




























































