
हिंदुस्थानच्या 73व्या स्वातंत्रदिनी गुगलने आकर्षक डुडल तयार करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. हिंदुस्थानी कलाकार शैवलिनी कुमार यांनी हे डुडल तयार केले आहे. या डुडलवर हिंदुस्थानची गौरवशाली परंपरा असलेली कला, धैर्य, शिक्षण आणि करुणा यासह देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. या डुडलवर हिंदुस्थानचे प्रतीक म्हणून देशाची लोकसभा, रिक्षा, चांद्रयान, पतंग, मोरपंख आणि राष्ट्रीय प्राणी वाघ अशा गोष्टींचा समावेश आहे.























































