
मॉब लिंचिंगमुळे चर्चेत आलेले ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडमध्ये मला आता कुणी कामच देत नाही असे स्पष्ट केले आहे.
या देशात पोलिसांपेक्षा गाईचे प्राण जास्त महत्त्वाचे आहेत असे वादग्रस्त वक्तव्य नासिरुद्दीन शाह यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तुम्ही हल्ली चित्रपटांमध्ये का दिसत नाही असे एका मुलाखतीत विचारले असता शाह म्हणाले, आज काल मला कोणी कामच देत नाही.’ यानंतर हसून शहा म्हणाले, की बॉलिकूडमध्ये हल्ली चांगले चित्रपटच बनत नाहीयेत. कोणतीही इंटरेसटिंग ऑफरही येत नसल्याचे त्यांनी सांगितले.


























































