पवारांच्या झेंड्याचा दांडा आमच्या हातात, दानवेंनी राष्ट्रवादीला खिजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिवस्वराज्य’ यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा लावण्याचे निर्देश दिले होते. अजित पवार यांच्या या आदेशावर भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे. पवारांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला खिजवले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी 17 आमदार संपर्कात, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

जालन्यात पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. अजित पवारांकडे आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिले, असे दानवे म्हणाले.