पक्षातून जाणाऱ्यांमुळे आमचा पक्ष स्वच्छ होतोय – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षातून जे जात आहेत त्यांच्यामुळे पक्ष स्वच्छ होत आहे, असे म्हणत पुन्हा एकदा सत्ता तरुणांच्या हातात देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केले आहे. ‘शिवस्वराज्य’ यात्रेदरम्यान ते बोलत होते. तसेच सुर्याजी पिसाळांच्या अवलादींशी कसं वागायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते. तोच धडा गिरवत आताच्या सुर्याजी पिसाळांशी दोन हात करण्यास जनता सज्ज झाली आहे, असेही ते म्हणाले.

पवारांच्या झेंड्याचा दांडा आमच्या हातात, दानवेंनी राष्ट्रवादीला खिजवले

दरम्यान, मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक गौप्यस्फोट केला. विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 17 आमदार रांगेत उभे आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे देखील राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते यावरून काय ते समजा, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी येत्या काळात राष्ट्रवादीला भगदाड पडणार असल्याचा इशारा दिला.