
विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत आहे. रोज एखादा नेता भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. काहींच्या मागे आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी चौकशीचा फास आवळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीला धक्का, पवारांचे विश्वासू आत्माराम कलाटे शिवसेनेत
आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादीच्या सातबारावर ज्यांची नावे होती, तेच सत्तेच्या लालसेने पळून गेले! – जयंत पाटील
‘काही जण पक्ष सोडून जात आहे. कुणाला बँकेची तर कुणाला कारखान्यांच्या चौकशीची अडचण आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा लोकांनी पक्ष आणि यांना नेतृत्व दिले होते.काही चुका झाल्या असतीलही पण जेव्हा महाराष्ट्र संकटात येतो त्यावेळी राष्ट्रवादीच सर्वात आधी मदतीला धावून जाते’, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दरम्यान, बुधवारी बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम कलाटे यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.





























































