कश्मीरमध्ये घुसखोरी करणार्‍या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन पाकिस्तानी दहशतवादी कश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा हिंदुस्थानी सैन्याने त्यांना अटक केली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नाजनीन खोखर आणि खलील अहमद असे दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत खोर्‍यातील स्थिती पूर्वपदावर येत आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच खोर्‍यात दहशतवाद्यांची संख्या पाच पटीने कमी झाली आहे. जिथे पूर्वी एक हजार दहशतवादी त्यांची संख्या 200 वर आली आहे. उरले सुरले दहशतवादी तुरुंगात जातील अन्यथा परिणाम भोगतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे.