15 वर्षीय शफाली हिंदुस्थानी संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हरमनप्रीत कौर (क्रिकेट) - पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस

हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 24 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या पाच ट्वेण्टी-20 व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियातील खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी मिताली राजकडे वन डे संघाचे तर हरमनप्रीत कौरकडे ट्वेण्टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ट्वेण्टी-20 संघामध्ये 15 वर्षीय शफाली वर्मा हिची निवड करण्यात आली आहे.

वन डे संघ

मिताली राज (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिष्ट, पूनम यादव, डी. हेमलता, राजेश्वरी गायकवाड, प्रिया पुनिया.

ट्वेण्टी-20 संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल, अनुजा पाटील, शफाली वर्मा, मानसी जोशी.