
हंगामा प्लेच्या ‘कट्यार’ आगामी मराठी ओरिजिनल शोमध्ये प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे आणि सायली पाटील प्रमुख भूमिकेत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे. शोची पटकथा अजून उघड झालेली नाही, तरी हा शो हॉरर-कॉमेडी असण्याची शक्यता आहे. शिवाजी लोटन पाटील म्हणाले, मला डिजिटल शोचे दिग्दर्शन करण्याचा आनंद मिळत आहे. यामधून मला माझी क्रिएटीव्हीटी सादर करण्याची मोकळीक मिळते. पटकथा आणि कलाकार प्रेक्षकांना संपूर्ण शो हसवत ठेवत त्यांचे मनोरंजन करतील. आम्ही आशा करतो की, प्रदर्शित झाल्यानंतर या शोचे जगभरातील प्रेक्षक कौतुक करतील.



























































