पाकड्यांच्या कुरापाती सुरूच, मसूद अझहरची तुरुंगातून गुपचूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या हिंदुस्थानविरोधातील कारवाया सुरूच आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझरला पाकिस्तानने अटक केली होती. आता गुपचूप त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

पाकड्यांनी नेहमीच दहशतवाद्यांना पाठीशी घातले आहे. आता दहशतवादामुळेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. असे असताना पाकिस्ताने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि जागतिक दहशतवादी मसूद अझहरची सुटका केली आहे. हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी  हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरला पाकिस्तानने अटक केली होती. तेव्हा ही कारवाई म्हणजे देखावा असल्याचे हिंदुस्थानने म्हटले होते. आता अझहरची सुटका झाल्याने हे कारवाईचे नाटकच होते असे सिद्ध झाले आहे.