रत्नागिरीत रेल्वेस्थानक,एसटी स्टँडवर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँण्ड परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणारी टोळी रत्नागिरी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी 32 लाख 60 हजार 368 रूपयांचा मुद्द्माल जप्त केला आहे. त्यामध्ये 29 लाख 85 हजार 848 रूपये किमंतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. रत्नागिरीचे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली.

गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषामध्ये पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमाक 1 वर दोन स्त्रिया, 2 पुरुष व 1 लहान मुलगा त्यांचा सामानासह बसले होते. त्यांच्या हालचालीबाबत पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांचे जवळ जावून त्यांना कोठे जाणार, कोठुन आलात याबाबत चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यानंतर पोलिसांनी बॅगांमध्ये काय आहे याची पहाणी केली असता त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, मोबाईल हँडसेट असल्याचे दिसून आले.त्यांच्याकडे 1041 ग्रॅम 28 मिली वजनाचे 29 लाख 85 हजार 848 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 422 ग्रॅम 44 मिली वजनाचे 8920 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, 1000 रुपये किंमतीची 06 मनगटी घडयाळे, 14 हजार 700 रूपये किंमतीचे 10 मोबाईल हॅन्डसेट, 2 लाख 50 हजार 800 रूपये रोख रक्कम व 100 रुपये किंमतीचे लोखंडी कटर असा एकूण 32 लाख 60 हजार 368 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. यामध्ये एकुण 26 मंगळसुत्र, 11 सोन्याचे हार, 9 चैन, 34 कानातील जोड, 6 कानातील चैन जोड, 25 अंगठया, 7 सोन्याची पाने, 2 गंथनीमधील वाटया, 1 ब्रोसलेट, 19 नथ यांचा समावेश आहे.पोलिसांनी शिवा राम साखरे (वय-35) ज्योती शिवा साखरे, (वय-25) अंजु उर्फ पद्मा शिवा शेट्टी (वय-33), विजय नरेश ऊर्फ राहूल धारी (वय- 21) यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.यावेळी पोलीस निरीक्षक शिरीष सासने,अनिल लाड उपस्थित होते.