चिदंबरम यांची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएक्स मीडियाच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात शरण यायला तयार आहे, अशी याचिका पी. चिदंबरम यांची दिल्लीच्या विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावली. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी ही याचिका फेटाळली. आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणात चिदंबरम हे तिहार जेलमध्ये सीबीआय कोठडीत आहेत. त्यांना सीबीआय कोठडीतून बाहेर काढण्यासाठी चिदंबरम यांचे वकील कपिल सिबल यांनी ही याचिका केली होती. चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरावर छापे मारण्यासाठी ईडी आणि सीबीआयचे अधिकारी रात्री पेहोचले हेते. मात्र, त्यांना सीबीआय कोठडीत देण्यात आली. त्यामुळे ईडीनेही त्यांची कोठडी घ्यावी, अशी मागणी सिबल यांनी या आधीच केली आहे.