विद्या मंदिर दहिसरला कबड्डीचे अजिंक्यपद व दुहेरी यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्या मंदिराचा 17 वर्षांखालील कुमारी संघ एकतर्फी अंतिम लढतीत अजिंक्य ठरला. तर 14 वर्षाखालील किशोरी संघने उपविजेते पद पटकाविले.

कुमारी संघाच्या विजयात कर्णधार गायत्री मांडवकर, उपकर्णधार अनुजा जाधव, चंचल राठोड, राधिका जाधव यांनी अष्टपैलू खेळ केला. तसेच आचल मोरे, नेहा हरवंदे, मिनाक्षी जंगले, भूमी घुमाडे, तेजश्री गोसावी, चेतना पाटील, प्रतिक्षा कन्हेर याही अंतिम लढतीत चमकल्या. किशोरी गटात कर्णधार ऋतुजा खेबाळे, उपकर्णधार भाग्यश्री फड , साक्षी चाफेकर यांच्या अष्टपैलू खेळाने तसेच सिद्धी कळंबटे, रुपाली घरत, श्रुती तेलंग, सृष्टी पाटील, अंजली कदम, अंकिता सलगर, भाविका गडकर, तेजश्री पाटील यांनी अंतिम लढत गाजविली. त्यामुळे वरील दोन्ही संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या संघांना शाळेचे क्रीडा प्रमुख व राज्य कबड्डी पंच विठ्ठल सुळे यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे. या सर्वांना शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.