
राज्यातील सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी, पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण माफ, बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता, स्वतंत्र नागरी प्राधिकरण, पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ, मराठी विद्यापीठाची स्थापना, कामगारांचे किमान वेतन 21 हजार रुपये अशी आश्वासने देत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा शपथनामा सोमवारी जाहीर करण्यात आला.
शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये बदल घडणार..
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्षांची महाआघाडी महाराष्ट्राचं सुवर्णयुग परत आणणार. #Shapathnama pic.twitter.com/bUhSwEKvgT— Congress (@INCIndia) October 7, 2019
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात संयुक्त पुरोगामी आघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,खासदार सुप्रिया सुळे,खासदार वंदना चव्हाण,राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक,काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड,काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते सचिन सावंत,आदी उपस्थित होते. अतिशय महत्वाच्या या प्रश्नांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणुक जाहीरनाम्यात स्थान दिलेले नव्हते. पण आम्ही ते स्थान दिले असल्याचे शपथनामा समितीच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
जाहिरनाम्यातील काही प्रमुख मुद्दे
- शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी
- बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
- शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज
- मोटर वाहन कायद्यान्वये आकारण्यात येणारा दंड कमी
- राज्यातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत
- कामगारांचे किमान वेतन 21 हजार रुपये
- मराठी भाषा सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार मराठी ही ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना
- सर्व महानगर पालिकांच्या हदीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
- नव्या उद्योगात 80 टक्के नोकर्या स्थानिक भूमिपूत्रांना देण्यासाठी विशेष कायदा























































