
झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयवरून अनेक वाद झाले आहेत. कधी पोलिसांसोबतचा वाद, कधी डिलिव्हरी करायचे पदार्थ डिलिव्हरी बॉयनेच खाल्ल्यावरून झोमॅटोवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पुन्हा एकदा झोमॅटो एका वेगळ्याच कारणामुळे वादात अडकला आहे.
@ZomatoIN @zomatocare@Rashmibansal #doglovers help @PETA #missingdog kidnapped by Zomato delivery guy Tushar Mobile number 08669582131on 7thOct from Poona at Karve Road,Deccan. pic.twitter.com/qLHnzEpwyT
— Vandana Shah (@Vandy4PM) October 8, 2019
झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय तुषार हा पुण्यातील कर्वे रोडवरील एका इमारतीत जेवण डिलिव्हर करायला गेला होता. त्यावेळी त्या इमारतीत राहणाऱ्या वंदना शहा यांचा बिगल प्रजातीचा पाळीव कुत्रा इमारतीच्या पॅसेजमध्ये खेळत होता. जेवण डिलिव्हर झाल्यानंतर तुषार परत जात असताना त्याने शहा यांचा कुत्रा चोरला.
त्यानंतर शहा आजबाजूला कुत्र्याची शोधाशोध केली. मात्र कुत्रा सापडला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या सोसायटीचा सीसीटीव्ही तपासला असता झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय तो कुत्रा पळवून नेत असल्याचे दिसले. त्यानंतर ज्यांनी झोमॅटोवरून जेवण मागवले होते. त्यांच्याकडून शहा यांनी त्याचा नंबर घेतला व त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला. मात्र तुषारने सुरवातीला फोन टाळले. मात्र नंतर त्याने त्याचा गुन्हा मान्य केला पण कुत्र्याला गावी पाठवल्याचे सांगितले. त्यामुळे शहा यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस तुषारचा शोध घेत आहेत.

























































