#ElectionResults2019 कळमनुरीतुन शिवसेनेचे संतोष बांगर विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळमनुरी विधानसभा क्षेत्रातुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी 18 हजाराच्या वर मताधिक्याने विजय मिळवला आहे. निकालाची औपचारीक घोषणा एका तासात होणार आहे. काँग्रेसचे गुजरात प्रभारी यांच्या होमपीचवर संतोष बांगर यांनी शिवसेनेचा भगवा दिमाखाने फडकवुन विजय मिळवला आहे.

बांगर कक्षाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांसोबतच फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली येथे देखील जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

https://www.saamana.com/maharashtra-assembly-election-results-2019/