
आम्हाला यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांकडून फटका बसला आहे. मात्र असे असले तरी देखील इतर, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या 15 जणांनी माझ्याशी संपर्क साधून आमच्या महायुतीसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे.
गेल्यावेळी आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यावेळी मिळालेल्या जागांपेक्षा आम्हाला यंदा कमी जागा मिळाल्या. शिवसेना, भाजप मधील बंडखोर जिंकून आल्याने आमच्या जागा कमी झाल्या आहेत. पण त्यांनी आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
































































