
आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला तरी चित्रपटसृष्टीवर मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. गेल्या दहा महिन्यांत बॉक्स ऑफीसवर 195 सिनेमे धडकले आहेत. या सिनेमांचे एकूण कलेक्शन 4418 कोटी झाले आहे. यंदाही छोटय़ा बजेटच्या सिनेमांनी चांगली कमाई केली आहे.
अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ने 200 कोटी, शाहीदच्या ‘कबीर सिंग’ने 278 कोटी तर नुकत्याच रिलीज झालेल्या हृतिकच्या ‘वॉर’ने 309 कोटींची तगडी कमाई केली आहे. विक्की कौशलच्या ‘उरी’ सिनेमालाही प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. एंटरटेन्मेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आल्यामुळे सिनेमांची कमाई वाढल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक सांगतात.

























































