धनत्रयोदशी महागली,सोने दरवाढीचा खरेदीवर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव चढेच असल्याने त्याचा खरेदीवर परिणाम होत आहे. नुकत्याच झालेल्या दसऱयाच्या मुहूर्ताला ग्राहकांनी सोने खरेदीत फारसा उत्साह दाखवला नव्हता. तोच ट्रेंड शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी कायम राहिला. सोन्याचा भाव प्रतितोळा 39,450 रुपये इतका राहिला.

महाराष्ट्रातील पूरस्थिती, वाढलेले सोन्याचे दर आणि निवडणूक यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सराफा बाजारावर मळभ आले आहे. आता या तीनही गोष्टींतून आपण बाहेर पडलो आहोत. लवकरच लगीनसराई सुरू होतेय. त्यामुळे बाजारात चैतन्य दिसेल अशी आशा जेम्स ऍण्ड ज्वेलरी कौन्सिलचे संचालक आशीष पेठे यांनी व्यक्त केली. सोन्याच्या तुलनेत आज धनत्रयोदशीला चांदीच्या शिक्क्यांना जास्त मागणी असल्याचे पेठे यांनी सांगितले.