सामान्यांच्या खिशाला कात्री, घरगुती गॅस 76 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

मंदी आणि महागाईने आधीच रडकुंडीला आलेल्या सर्वसामान्यांना आजपासून गॅस दरवाढीचा फटका बसला आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 76 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीच भुर्दंड पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांतील सलग तिसरी गॅस दरवाढ आहे.

दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरसासाठी 681.50 रुपये, कोलकातामध्ये 706 रुपये, मुंबईत 651 रुपये आणि चेन्नईत 696 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 19 किलोच्या घरगुती गॅससाठी 1204 रुपये, कोलकातामध्ये 1258, मुंबईत 1151.50 तर चेन्नईत 1319 रुपये मोजावे लागणार आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती.

मुंबई 14.2 किलोसाठी – 651 रुपये
19 किलोसाठी – 1151.50 रुपये