मिशा तरी साफ करायच्या होत्या, स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायम तिच्या बोल्ड सिन्ससोबतच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. स्वराने वीरे दी वेडिंग सिनेमात दिलेल्या हस्तमैथुनाच्या सीनवरून मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकऱ्यांनी तिच्या त्या बोल्ड सिनवरून तिला बरीच खरी खोटी सुनावली होती. स्वराच्या चित्रपटांवरूनच नाही तर तिच्या राजकीय वक्तव्यांवरून देखील ती बऱ्याचदा वादात अडकली आहे. त्यामुळे स्वरा भास्करसाठी सोशल मीडियावर ट्रोल होणे हे काही नवे राहिलेले नाही.

मात्र यावेळेस स्वरा एका वेगळ्याच कारणाने ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी स्वराच्या हॅलोविन लूकची जबरदस्त खिल्ली उडवली आहे. स्वराने केलेल्या डार्क मेकअपमुळे तिच्या ओठांच्यावर काळपटपणा आला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला तुला मिश्या आल्या का? मिशा स्वच्छ तरी करून यायच्या होत्या, अशा भयंकर शेरेबाजी करत ट्रोल केले आहे.

 

स्वराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा हॅलोविन लूक शेअर केला होता. यात तिने आॅफ शोल्डर टॉप आणि लॉन्ग स्कर्ट सोबत सिल्व्हर ज्वेलरी घातली आहे. .तिची हेअरस्टाईल देखील अगदी विचित्र असून कपाळाच्या वर तिने मोठ्या मोठ्या फुलांचा फुलोरा तयार केला आहे. तिचा मेकअप देखील डार्क आहे. सगळंच अगदी विचित्र असल्यामुळे स्वराचा हा लूक फ्लॉप ठरला आहे.