
अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या विनोदी भुमिकांसाठी ओळखळा जातो. हाऊसफुल्ल-4 चित्रपटातही त्याने विनोदी भूमिकाच केली आहे. असाच त्याचा काहीसा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तो त्याच्या दोन मुलांसोबत नाचताना दिसत आहे.
Thank you for all the love that you have given to #Housefull4 – time to do the #BalaChallenge with my #Halloween cubs – Riaan & Rahyl – mommy shoots the video @geneliad pic.twitter.com/CdoBWwT1cR
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 2, 2019
सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारने सुरू केलेल्या ‘बाला चॅलेंज’ जोरदार गाजत आहे. अनेक सेलिब्रिटी हे चॅलेंज स्वीकारत असून बाला चॅलेंजमध्ये देण्यात आलेली स्टेप करताना दिसत आहेत. रितेशने देखील त्यांच्या दोन मुलांना घेऊन बाला चॅलेंज स्वीकारले असून त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत तो व त्याची दोन मुलं बाला बाला गाण्यवर नाचताना दिसत आहेत. हाउसफुल 4 या चित्रपटात बाला बाला हे गाणे असून अक्षयने त्या गाण्यावरून हे चँलेंज दिले आहे.
खिलाडी अक्षय कुमार, रितेश देशमुख तसेच इतर कलाकार बाला चॅलेज चा डान्सस्टेप करुन सोशल मीडीया वर व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामुळे बाला चॅलेज व्हायरल होत आहे. अक्षय व रितेशची मुख्य भूमिका असलेला हाऊसफुल 4 या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 150 कोटी कमावले आहेत.



























































