गेवराईत विभागीय आयुक्तांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल, शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले. गेवराई तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतना त्यांनी हे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसानभरपाईचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पंचनाम्यासाठी कोणाचीही अडवणूक न करता नुकसान भरपाईचा अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यावेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रेकर यांनी तालुक्यातील रेवकी देवकी संगमजळगाव येथील गावांना भेट दिली. तात्काळ नुकसानभरपाईचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.