शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजारांची मदत मिळायला हवी- उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. तेथे कन्नड तालुक्यातील कानडगाव येथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या प्रश्नांचा आणि मागण्यांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. दुपारी चार वाजता संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशर्तींशिवाय ताबडतोब मदत देण्यात यावी. प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत म्हणून देण्यात यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

वाचा या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस पाठवली तर गाठ शिवसेनेशी आहे, उद्धव ठाकरे यांचा सज्जड दम
  • शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळायलाच हवेत.
  • शेतकऱ्याला कोणत्याही अटीशर्तींशिवाय मदतीची गरज आहे, जी ताबडतोब व्हायला हवी
  • सध्याची परिस्थिती वाईट आहे. 25 ते 50 हजार प्रतिहेक्टर ही प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे.
  • शेतकऱ्यांना बँका ज्या नोटिसा पाठवत आहेत, त्या त्वरित थांबवा
  • या संकटात राज्य सरकार कमी पडलं तर केंद्रानेही पुढाकार घ्यावा
  • ही मदत नसून कर्तव्य आहे. जे तातडीने करणं गरजेचं आहे.
  • जास्त कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्याला मदत करण्यात यावी
  • 10 हजार कोटींची रक्कम तुटपुंजी आहे
  • शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यात येईल
  • प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजार रुपये प्रति हेक्टर कोणत्याही अटीशर्तींशिवाय तातडीने देण्यात यावे
  • शिवसेना बळीराजाच्या पाठीशी संपूर्णपणे उभी आहे.
  • इतर वेळी दुष्काळ असतो, या वेळी विचित्र घडलं आहे.
  • या भेटी फक्त नावाच्या भेटी नाहीत.
  • इथल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलो आहे.
  • अशा परिस्थितीशी लढा देणं गरजेचं आहे.
  • गुरांचा चाराही उद्ध्वस्त झाला आहे.
  • शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. कारण हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.
  • पाहणी दौऱ्यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली आहे
  • धन्यवाद देण्यासाठी यायचं होतं, पण या कारणासाठी यावं लागलं.
  • विधानसभेत या जिल्ह्याने सर्व जागा महायुतीच्या पदरात घातल्या, त्यासाठी धन्यवाद
  • कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत