आयफोन चोराला पकडण्यासाठी इंजिनीयरने धावत्या ट्रेनमधून मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

हातातला आयफोन खेचून पळणाऱ्या चोराला पकडण्यासाठी धाकत्या ट्रेनमधून उडी मारणाऱ्या 27 वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनीअरचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या उलुबेरिया स्थानकात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच या इंजिनीअरचा मृत्यू झाला.

मूळचे जमशेदपूरचे असणारे सौरभ घोष शनिवारी संबलपूर एक्स्प्रेसने आपल्या घरी निघाले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. सौरभ घोष ट्रेनमध्ये डब्याच्या अखेरीस खिडकीजकळ बसले होते. रात्री 11च्या सुमारास ट्रेन उलुबेरिया स्थानकात थांबली. त्यावेळी ते नवीनच आयफोनवरून कोणाबरोबर तरी बोलत होते. ट्रेन सुरू होताच एका व्यक्तीने सौरभ यांच्या हातातला आयफोन हिसकावला व उडी मारून पळ काढला. घोष चोराचा पाठलाग करताना धावत्या ट्रेनमधून उडी मारताच जबर जखमी झाले होते.