‘बाला’चा 25 कोटींचा गल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागणे हा कथाविषय असलेला अमर कौशिक यांचा ‘बाला’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत 25.88 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘बाला’ने 10.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर शनिवारी 15.73 कोटी रुपयांची कमाई केला. या कमाईत चांगली वाढ होणार असल्याची शक्यता तरण आदर्शने वार्तवली आहे. ‘बाला’मध्ये तरुणाईची मानसिवता दिग्दर्शकाने अचूक पकडली आहे. त्यामुळेच हा चित्रपट केवळ अचानक टक्कल पडलेल्या तरुणाच्या गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो अनेक विषयांना स्पर्श करत पुढे जातो. म्हणूनच हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करतोय.