
दादा भगवान यांच्या 112 व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जैनांचे सध्याचे तिर्थंकर सिमंधर स्वामी यांच्या विशाल अशा 13 फूट मूर्तींसोबत भगवान कृष्ण आणि शिव मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना बोरिवली पूर्व येथे ऋषिवन, काजूपाडा येथे करण्यात आली आहे. दादा भगवान परिवाराचे प्रमुख दीपक यांच्या हस्ते हा विधी पार पडला. सिमंधर स्वामींची ही आजवरची सर्वात महाकाय मूर्ती आहे. यासोबतच बोरिवली पश्चिमेकडील चिकूवाडी मैदानात आनंद नगरी साकारण्यात येत आहे. आबालवृद्धांसाठी ज्ञान- मनोरंजनासह आध्यात्मिक आनंद घेता येईल.


























































