चिंता कशाला करताय ? शिवसेना पाठीशी आहे, युवासैनिकांनी दिला शेतकऱ्यांना धीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकट कोणते ही असो त्या संकटाचा सामना करण्याची ताकद शिवसेनेत आहे. तुम्ही कशाला चिंता करताय ओल्या दुष्काळाची शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, परिस्थिती कोणतीही असो खचायचे नाही अन धीर सोडायचा नाही. आपल्या कुटूंबासाठी लेकरा – बाळांसाठी पाय रोवून उभे राहायचे असे भावनिक आवाहन युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जी वाताहत झाली त्याच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्यानंतर युवा सेना कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी आज बीड जिल्ह्यातील बीड, केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव तालुक्यातील गावागावात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. भयाण परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम अंकित प्रभू यांनी केले. केज तालुक्यातील डाकेफल या परिसरातील शेतीची पाहणी करून केज तहसीलदार यांना त्यांनी निवेदन दिले तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची त्यांनी मागणी केली. नंतर त्यांनी साकुड ता. अंबाजोगाई भागात पाहणी करून तहसीलदारांना निवेदन दिले. परळी तालुक्यातील गाडे पिपळगाव, मल्हादपूर या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर, शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, अभयकुमार ठक्कर, रामराजे सोळंके, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, महिला आघाडीच्या संघटक रत्नमाला मुंडे, विद्यार्थी सेनेचे अतुल दुबे, सहसंघटक योगेश नवले, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, अर्जुन वाघमारे, व्यंकटेश शिंदे, अंबाजोगाई शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, अनिल बडे, राजेश विभुते, दत्ता रांजवण, अभिजित भालेकर, पापा सोळंके, बाळासाहेब मेंढके, अक्षय भूमकर, अभिमन्यू वैष्णव, अनिल ठोंबरे, अरविंद थोरात, विकास काशीद, रामनाथ घोडके, शुभम डाके आदी पदाधिकारी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.