
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे आराध्य दैवत. स्फूर्तीचा हा जिवंत झरा आजही आपल्या विचारांनी शिवसैनिकांसह तमाम मराठी जनतेला प्रेरणा देत असतो. शिवसेनाप्रमुख आजही आपल्यातच आहेत अशीच प्रत्येकाची भावना. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी याच भावनेने लाखो शिवसैनिकांचा शिवसागर आज शिवतीर्थावर लोटला.
गडकरी, फडणवीस, पवारांसह दिग्गजांचे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनीही शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
शिवसेनाप्रमुखांचा आज सातवा स्मृतिदिन. मिळेल साधनाने शिवसैनिक आणि शिवप्रेमी शिवतीर्थावर दाखल होत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अंगी बाणवलेल्या शिस्तीनेच या शिवसैनिकांनी आपल्या दैवताचे दर्शन घेतले. शिवतीर्थावरील रांगेने शिवाजी पार्क जिमखान्यापर्यंतचे टोक गाठले, पण तळपत्या उन्हातही शिस्त मोडू न देणाऱ्या या रांगेला आस आणि ध्यास होता तो शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्याचा. शिवतीर्थाकडे येणारा प्रत्येक रस्ता भगवामय झाला आहे. भगवा पटका, भगवी उपरणी, हाती भगवे झेंडे घेऊन दाखल होणारे आबालवृद्ध, महिला आणि वाघाची निशाणी असलेल्या लांबच लांब पताका यांनी वातावरण भगवेमय झाले.
Sanjay Raut, Shiv Sena: We will do anything for #Balasaheb, govt will be formed. The promise which Uddhav ji made to Balasaheb, that there will be a Chief Minister from Shiv Sena…you will soon see that Maharashtra CM will be from Shiv Sena. https://t.co/Zi31eXBWfQ pic.twitter.com/1BnpZyTKxo
— ANI (@ANI) November 17, 2019





























































