शिवसेनेच्या अमरावती जिल्हाप्रमुखांना पितृशोक, डॉ. गणेश बूब यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख दिनेश बूब यांचे वडील डॉ. गणेश बूब यांचे रविवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा दिनेश, डॉ.राजेश व रितेश बूब असा आप्त परिवार आहे.

डॉ.बूब यांनी मृत्युपूर्वी देहदान करण्याचा संकल्प केला होता. रविवारी रात्री निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय देहदानासाठी पाठविण्यात आला होता. मात्र अलिकडच्या काळात डॉ. बूब हे बरेच दिवसापासून आजारी होते. त्यांच्या शरीरात औषधांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्यांचा मृतदेह दान करता आला नाही.

बूब याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी अंत्यसंस्काराला उपस्थित होती.