
उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक शहरांची आणि ठिकाणांची नावे बदलली आहे. इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसराय जंक्शनचे पंडित दीन दयाल उपाध्याय केल्यानंतर आता आणखी आग्रा आणि अलिगढ या दोन शहरांची नावे बदलली जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी आग्रा शहराचे नाव बदलून अग्रवन करण्यात येणार असल्याची बातमी आली होती. अद्याप याबाबत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आग्र्याचे नाव बदलण्याबाबत सरकारने आंबेडकर विद्यापीठातील तज्ज्ञांकडून माहिती मागवली होती. आता अलिगढ या शहराचे देखील नाव बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीतील भाजप कार्यकर्ते आतापासून अलिगढचा हरीगढ असा उल्लेख करताना दिसून येत आहेत.
https://www.saamana.com/yogi-
याआधी देखील अलिगढ शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न झाला होता. माजी कल्याण सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अलिगढचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु केंद्रात काँग्रेस सरकार असल्याने ते यशस्वी झाले नाहीत. परंतु योगींनी यापूर्वीही शहरांची नावे बदलली असून आता केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने यातही ते यशस्वी होतील अशी भाजप कार्यकर्त्यांची धारणा आहे.
योगी आदित्यनाथ यांनी 2018 मध्ये इलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केले होते. याचवेळी आझमगढचे नाव बदलून आर्यमगढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच खासदार सतिश गौतम आणि आमदरा संजीव राजा यांना अलिगढचे नाव बदलून हरीगढ करण्याची मागणी केली होती. त्याआधी 2015 मध्ये विश्व हिंदू परिषदेने एका बैठकीमध्ये अलिगढचे हरीगढ नाव करण्याची मागणी केली होती. आता योगी सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.





















































