लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या पद आणि पात्रता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्हालाही हिंदुस्थानी सैन्यात सामील होऊन देश सेवा करण्याची इच्छा असेल तर, आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. हिंदुस्थानी लष्कराने मुंबईत मोठी लष्कर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे हिंदुस्थानी सैन्याच्या विविध पदांवर उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.

मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व नाशिक येथील तरुणांना संधी देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2019 आहे.

भरतीची तारीख व ठिकाण

ही भरती 13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान मुंब्र्यातील कौसा व्हॅली येथील अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलाच्या मैदानावर होईल.

पद नाम

सैनिक (सामान्य ड्यूटी), सैनिक टैक्निकल/सैनिक टैक्निकल एविएशन, सैनिक नर्सिंग असिस्टेंट, सैनिक क्लर्क/स्टोर कीपर, सैनिक ट्रेडमैन

शैक्षणिक पात्रता

शिपाई (सामान्य) 1 ऑक्टोबर 1998, 168 सेंमी 50 77/82 किमान 45 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण. ते प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण

1 एप्रिल 2002

शिपाई (तांत्रिक) 1 ऑक्टोबर 1996 167 सेंमी 50 76/81 किमान 50 टक्क्यांसह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण ते प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण

1 एप्रिल 2002

शिपाई (नर्सिंग)

शिपाई (तांत्रिक लिपीक) वरीलप्रमाणे 162 सेंमी 50 77/82 60 टक्के गुणांसह कुठल्या शाखेतील बारावी उत्तीर्ण प्रत्येक विषयात किमान 50 टक्के तसेच इंग्रजी, बूक किपिंग 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक शिपाई (ट्रेडमन) वरीलप्रमाणे 168 सेंमी 48 76/81 किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

सर्व पदांच्या उमेदवारांची लांबी किमान 170 सेमी आणि छातीचे मापन 77-82 सेमी असावे. त्याचबरोबर सैनिक लिपिक / स्टोअर कीपरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची लांबी किमान 162 सेमी असावी.

अर्ज फी

सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे करा ‘क्लिक’