
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे रविवारी सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून होणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हे अधिवेशन केवळ एका आठवडय़ाचे असणार आहे.
नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव, विधानसभेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी 30 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. शनिवारी बहुमत ठरवाचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर रविवारी विधानसभेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेतेपदाची निवड झाली. यानंतर संध्याकाळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अध्यक्ष पटोले यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे सांगितले. 16 डिसेंबर रोजी हे अधिवेशन सुरु होणार असून अधिवेशनाचे कामकाज 21 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.




























































