मेनोपॉज पॉलिसीवर संशोधनाची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Smriti Irani Minister of Textiles

सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱया महिला कर्मचाऱयांसाठी मेनोपॉज पॉलिसी नसल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. तसेच हे धोरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व घटकांचा सर्व बाजूंनी काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजेच मेनोपॉजमुळे महिला कर्मचाऱयांच्या होणाऱया शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱया तणावाबद्दल ठोस संशोधनाची आवश्यकता असल्याचे इराणी म्हणाल्या. मेनोपॉज ही महिलांच्या जीवनातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजमुळे काही महिलांना त्रास होतो, तर काहींना होत नाही, मात्र या काळात महिलांमध्ये अनेक लक्षणे दिसून येतात असे ईराणी म्हणाल्या.