
उन्नाव व हैदराबाद येथील बलात्कार पीडितेंसोबत झालेल्या हैवानियतने संपूर्ण देश संतापलेला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारचा संतापजनक प्रकार घडला आहे. फतेहपूर जिल्ह्यातील एका 18 वर्षीय तरुणीवर तिच्या चुलत काकाने बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ती 90 टक्के भाजली असून तिच्यांवर कानपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उन्नाव घटनेच्या आठवडाभरातच घडलेल्या या दुसऱ्या घटनेने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे.
Fatehpur: A woman was allegedly raped and set ablaze by her uncle in Husainganj. Police says, “FIR has been registered and five teams have been deployed to nab the accused. We will investigate the matter from all angles.” pic.twitter.com/tOVlhS4oAi
— ANI UP (@ANINewsUP) December 14, 2019
पीडित तरुणीचे तिच्या चुलत काकासोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमसंबंध जगासमोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तिचे व काकाचे लग्न लावून देण्यासाठी पंचायतीकडे मदत मागितली होती. मात्र तरुणीसोबत लग्न करायचे नसल्याने काकाने लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर त्याने 13 डिसेंबरला तरुणी तिच्या घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच सदस्यीय पथक तयार केले आहे. नराधम आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



























































