
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात ईशान्यकडील राज्य, राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निदर्शनं सुरू आहेत. अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. एकीकडे काँग्रेसह अन्य पक्ष याचा विरोधत करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये हे विधेय योग्य असल्याचे म्हणत आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील काँग्रेसची प्रतिक्रिया पाहून हे 100 टक्के योग्य असल्याचे सिद्घ होतंय असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते झारखंडमधील प्रचार रॅलीमध्ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशात ज्या-ज्या भागांमध्ये हिंसाचार सुरु आहे तो राजकीय प्रेरित तसंच पूर्वनियोजित आहे. कपड्यांवरुनच हिंसाचार कोण करत आहे आणि हे लोक कोण आहेत हे समजतं, असेही मोदी म्हणाले. देशातील सार्वजनिक संपत्तीला आग लावणारे टीव्हीवर दिसत आहेत. त्यांच्या कपड्यांवरुन त्यांना आपण ओळखू शकतो. संपूर्ण देश आपल्याकडे पाहत आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय अगदी 100 टक्के योग्य होता हे सिद्ध झालं आहे, असेही मोदी म्हणाले.
मी जिवंत असेपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही! – ममता बॅनर्जी
आसाम व ईशान्येतील जनतेचे मानले आभार
नरेंद्र मोदी यांनी शांतता राखल्याबद्दल आसाम आणि ईशान्येतील जनतेचे आभार मानले. हिंसाचार करणाऱ्यांना जनतेने आपल्यापासून वेगळं केलं आहे. शांततेत आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगत आहे. देशाची मान कोणत्याही परिस्थितीत झुकणार अशाप्रकारे आसाम आणि ईशान्येकडील जनता काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

























































