मुरुड नगर परिषदेच्या अंतिम अधिसूचना काढण्याविषयी खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमधील मुरुडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी निधी अभावी मुरुड ग्रामपंचायत सक्षम नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या अंतिम अधिसूचनेला मान्यता देण्यासंदर्भात शासनास शिफारस करावी. या विषयी खासदार ओमराजे निंबाळकर यांना संघर्ष कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यासंदर्भात 22 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राथमिक अधिसूचना काढली होती. परंतु अद्यापही शासनाने नगर परिषदेची अंतिम अधिसूचना काढलेली नाही त्यामुळे मुरुड ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेत होण्यास खूप विलंब होत आहे. मुरुड ग्रामपंचायतीने 2012 सालीच नगर परिषदेची पात्रता पूर्ण केली आहे जसे की पंचवीस हजाराच्या पुढे लोकसंख्या आहे, 20 किलो मीटर अंतरावर दुसरी नगरपालिका नाही, अकृषिक क्षेत्र 2012 साली चाळीस टक्के होते आज 2019 साल आहे निश्चितच अकृषिक क्षेत्र वाढलेले असेल. दिलेल्या निवेदनावर संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयदीप सुरवसे, उपाध्यक्ष राजेंद्र देवकर, रवी सूर्यवंशी, नाना कुंभार यांच्या सह्या आहेत.