
देशात अनेक आंदोलन ही विद्यार्थ्यांनीच केली आहेत. त्यामुळे आता होणारी विद्यार्थ्यांचीची आंदोलने ही अनपेक्षित नाहीत. तरीही विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरूच नये असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
अणुशस्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीलनचरित्रालर आधारित ‘सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक – डॉ. अनिल काकोडकर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना काकोडकर यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरूच नये, असे आपले स्पष्ट मत असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी गप्प न बसता आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त झाले पाहिजे. आपण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूपच मागे आहोत. नवनवीन तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा निर्माण करण्याकरिता लागणारी सामग्रीची मोठय़ा प्रमाणात आपल्या देशाला गरज असल्याचे ते म्हणाले.























































