या घोड्याच्या किमतीत मुंबईत येईल एक अलिशान घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांवर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या घोड्यांच्या विजयामुळे त्यांचे मालक पण एका रात्रीत मालामाल बनतात. त्यामुळे शर्यत लावणाऱ्यामध्ये अशा घोड्यांना चांगलीच मागणी असते. त्यामुळे अशाच एका सुपरफास्ट घोड्याची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल. हा घोडा एक्सप्रेस गाड्यांच्या वेगाने धावतो असा दावा त्याच्या विक्रेत्यांनी केला होता.horse1

राजस्थानच्या सारंगखेडा मध्ये आयोजित केलेल्या चेतक उत्सवात विक्रीसाठी देशभरातून 500 घोडे आले होते. या घोड्यांमध्ये सर्वात जास्त बोली लागली ती शान या घोड्याची. पाच वेळा शर्यत जिंकलेला ‘शान’ घोड्यसाठी तब्बल 10 कोटी रुपयांची बोली लागली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे राहणाऱ्या तारा सिंग यांनी हा घोडा खरेदी केला आहे.

horse2

घोड्याचे मालक तारा सिंह यांनी सांगितले की, शान एक्सप्रेस ट्रेनच्या गतीन धावतो. त्याचा वेग हा ताशी 80 किलोमीटर इतका आहे.horse3

शान पाच वर्षाचा असून त्याची उंची 5.5 फूट आहे. घोड्याच्या शर्यतीमध्ये पाच वेळा विजेता झाला आहे. दोन वेळा मुक्तसर जत्रेत,एक वेळा पटियाला मध्ये तसेच एक वेळा जोधपूर मध्ये आणि एक वेळा पुष्कर राजस्थान च्या जत्रेमध्ये शान विजयी ठरला आहे.horse4
शानला आहारात दररोज 100 ग्राम तूप दिले जाते. तर सामान्य आहारात चणे आणि गव्हाचे दाणे खायला दिले जातात.तसेच शान दररोज 500/-रुपयांचा चारा खातो.