
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरुद्धच्या आंदोलनात हिंसाचार करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषींविरुद्ध उत्तरप्रदेश सरकारने कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. मुझ्झफरपूर प्रशासनने या आंदोलनादरम्यान सार्वजानिक आणि सरकारी संपत्तीची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. लखनौ प्रशासनानेही 100 हिंसाचारी आंदोलांकाना नोटीस पाठवून तुमच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई का करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा – हिंसक आंदोलनावर मोदींची टोचले नागरिकांचे कान
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्ध उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनात सर्वाधिक 16 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान झालेल्या बळींबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे. यासंदर्भात युपीचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांना मानवाधिकार आयोगाला 4 आठवड्यात उत्तर द्यायचे आहे.
जयंत चौधरी यांना मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखले
मुझफ्फरपूर येथील आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या खालापार निवासी नुराच्या नातेवाईकांना भेटायला जाणारे आरएलडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयंत चौधरी यांना मुझफ्फरपूर पोलिसांनी शहराबाहेरच रोखले.त्यानंतर चौधरी यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
स्वतःला निर्दोष सिद्ध करा, अन्यथा मालमत्ता जप्ती : जिल्हा प्रशासन
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 19 डिसेम्बरला लखनौच्या खदरा,हुसेनाबाद आणि परिवर्तन चौक भागात आंदोलकांनी मोठी तोडफोड, जाळपोळ करीत पोलिसांवर तुफानी दगडफेक केली होती. या हिंसाचारातल्या 100 आंदोलकांना नोटीस पाठवत जिल्हा प्रशासनाने स्वतःला निर्दोष सिद्ध करा अन्यथा मालमत्ता जप्तीला तयार राहा असे बजावले आहे.मीरतच्या 141 आंदोलकांना 14 लाख रुपयांच्या संपत्तीचे नुकसान भरून द्या, असेही आदेश मीरत प्रशासनाने नोटीसी पाठवून दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर यूपीच्या आंदोलनग्रस्त जिल्ह्याच्या प्रशासनांनी पोलिसांच्या मदतीने या आंदोलनात हिंसाचार माजविणाऱ्या दोषींची ओळख पटवली आहे.



























































