पर्यटकांना कोकणी मेव्याची मेजवानी देणाऱ्या सरस प्रदर्शनाला गणपतीपुळ्यात प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे व पुढील वर्षी होणाऱ्या सरस प्रदर्शनी साठी निधी दुपटीने वाढवून देण्यात येईल अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी आज गणपतीपुळे येथे केली. गुरुवारपासून सुरु झालेल्या सरस प्रदर्शनात जिल्ह्यातील 115 महिला बचतगट सहभागी झाले आहेत.पाच दिवस चालणाऱ्या याप्रदर्शनात बचत गटांची तयार केलेल्या कोकणी पदार्थांची मेजवानी वर्षअखेरीसाठी गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना लाभणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने, जि.प सदस्य महेश म्हाप सभापती साधना साळवी, विभांजली पाटील, अभिजीत तेली व इतर मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

गणपतीपुळे येथील बीचवर आयोजित या प्रदर्शनात 185 स्वयंसहाय्यता बचत गट सहभागी झाले आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जीवनोन्नती अभियान नाबार्ड आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपास साळवी या होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना रत्नागिरीत शाश्वत स्वरूपाचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देऊ असे सांगून आमदार म्हणाले की या महिलांना प्रशिक्षण सातत्यपूर्ण पाठिंबा आणि अर्थसहाय्य यातून पुढे जाता येईल याचे नियोजन अधिकाऱ्यांनी करावे. परदेश सहलीचे आयोजन देखील करता येईल ज्यातून तेथे होणाऱ्या विक्री व पॅकिंग संदर्भातील माहिती या महिलांना मिळू शकेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करा, असे आमदार सामंत यावेळी म्हणाले. या प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.